भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दोघांना चिरडले

Mon 09-Jun-2025,10:52 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:- अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत ते औंढा नागनाथ मार्गावरील वाई फाट्याजवळ कार व दुचाकीचा रविवारी रात्री ९. ४० वाजता भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील शेख मोबीन शेख सलीम (वय २४), शेख आवेज शेख जावेद (वय २३, दोघे रा. बहिरोबाचोंडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.बहिरोबाचोंडी येथील शेख मोबीन शेख सलीम, शेख आवेज शेख जावेद हे रविवारी वसमत येथे दिवसभर मजुरी करून दोघेही रात्री दुचाकीवर गावाकडे निघाले होते. वसमत ते औढा नागनाथ मार्गावरील वाई फाट्याजवळ रात्री ९:४० वाजेदरम्यानात औंढा नागनाथकडून येणाऱ्या भरधाव कार सोबत त्यांच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील शेख मोबीन शेख सलीम (वय २४), शेख आवेज शेख जावेद (वय २३, )दोघे राहणार  बहिरोबाचोंडी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताने या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी सपोनि रामदास निरदोडे, भालेराव, संतोष पटवे आदींनी वाहतूक सुरळीत केली. घर काही अंतरावर राहिले असताना अपघातात तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.